देवेंद्र फडणवीस जळगावात दाखल

भुसावळ प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावात दाखल झाले असून ते धुळे आणि नंदुरबार येथे प्रचारासाठी जाणार आहेत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काल रात्री दुरंतो एक्सप्रेसने भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाले. माजी आमदार हरीभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे आणि अन्य मान्यवरांनी फडणवीस यांचे रेल्वे स्थानकावर स्वागत केले. यानंतर फडणवीस हे रात्री जळगाव येथील जैन हिल्स येथे मुक्कामी राहिले. आज सकाळपासून गिरीश महाजन आणि अन्य नेत्यांसोबत फडणवीस यांनी चर्चा केल्याचे वृत्त आहे.

Protected Content