यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील मागील सर्व पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी वापरण्यात आलेल्या तहसील कार्यालयातील जुन्या इमारतीमध्ये ठेवलेल्या सर्व इव्हीएम यंत्रणा मुक्ताईनगर येथे वरिष्ठांच्या आदेशान्वये जमा करण्यात येत आले.
जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्या आदेशाने व रावेरच्या तहसीलदार उषारानी देवगुणे यांच्या सुचनेवरून सदरचे इव्हीएम यंत्रणा यावलच्या जुन्या तहसील इमारतीत सार्वत्रिक निवडणुकी संपल्यावर येथे जमा करून सुमारे ४०४ बियु आणि ४०४ सियु युनिट ठेवण्यात आले होते.
ते सर्व मुक्ताईनगर येथे पाठवण्यात आले. याप्रसंगी यावलचे निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तर यावल तहसील कर्मचारी आनंद बनवार , पराग सरोदे, युनुस खान आणि बाळु पाटील या यंत्रणा पाठवण्याची प्रक्रिया पार पडली.