अमळनेर प्रतिनिधी । भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीच्या माध्यमातून निर्माण झाली. निवडणूक प्रक्रिया आनंददायी व खेळीमेळीच्या वातावरणात झाली पाहिजे तशी न होता काही अधिकारी वर्गाच्या मनमानी कारभारामुळे ती तापदायक होत आहे हे निश्चित. निवडणूक प्रक्रिया व तिचे प्रशिक्षण खेळीमेळीच्या वातावरणात कर्मचाऱ्यांना दिली तर कर्मचारी स्वखुशीने निवडणुकीचे कर्तव्य पार पाडू शकतो, पण सद्यस्थितीमध्ये ते दिसत नाही. निवडणूक प्रशिक्षणात अनेक कर्मचारी सेवानिवृत्त वयाची असतात अनेक शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना विविध आजारांनी व्याधी असते अशातच त्यांना निवडणूक प्रशिक्षणाच्या कामी जुंपले जाते. त्यात प्रशिक्षण देणारे सकारात्मक असले तर ठिक असते, काही ठिकाणी प्रशिक्षणातच शिक्षकांना धमकीवजा व कलमांचे हत्यार पुढे करून गळचेपी केली जाते. त्यांना त्यांचे कर्तव्य सांगितले जाते एखादा शिक्षक शंभर 150 किलोमीटर पर्यंत प्रशिक्षणाला त्याठिकाणी बोलवले जाते.
जळगाव जिल्ह्यातील दोन शिक्षकांचा प्रशिक्षणातील मृत्यूने जिल्हा हादरला
सध्या उन्हाळ्याचे दिवस तो आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतो. अशातच या प्रशिक्षण कामी त्याचा बळी जातो याला जबाबदार कोण? प्रशिक्षण झाले पाहिजे. पण एवढ्या लांब ठेवण्याचा शासनाचा काय हट्टाहास शिक्षकांना निवडणुकीत कोणीही निवडून येऊ याच्याशी त्याला कोणतेही देणेघेणे नसते तो आपली सेवा प्रामाणिकपणे करीत असतो. ते तालुक्याच्या वीस किलोमीटर ठेवले किंवा तालुक्यातच ठेवले. तर प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने होऊन शिक्षक स्वखुशीने ड्युटी करू शकतो. पण शासन निवडणूक आयोग यातून काय साध्य करू पाहत आहे हे कर्मचारी वर्गांना न उलगडलेलं कोडं आहे. दोन दिवसात या निवडणूक प्रशिक्षणाच्या कामात दोन शिक्षकांचा बळी जातो आज त्यांची मुलं पत्नी नातेवाईक उघड्यावर पडतात. याचा शासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. निवडणूक कामी शिक्षकांना अत्यंत हीन वागणूक दिली जाते. काल चाळीसगाव या ठिकाणी निवडणूक प्रशिक्षणाला आलेले शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे येथील आदर्श शिक्षक ए.बी. चौधरी प्रशिक्षण होऊन परतताना चाळीसगाव बसस्थानकासमोर चक्कर येतो आणि दवाखान्यात पोहोचत नाही तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मावळते. ही घटना हृदयाला चटका लावून जाते. काल चाळीसगाव मध्ये प्रशिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचे नियोजन नव्हते. कर्मचारी वर्गांना चहा नाश्ता देण्यात आला नाही. ज्या ठिकाणी प्रशिक्षण ठेवले होते. त्याठिकाणी गरम वाफा असल्याने शिक्षकांना बसणे मुश्किलीचे होते. हजेरीपत्रकावर सह्या करण्यासाठी शिक्षकांनी रांगेत वीस ते पंचवीस मिनिटं उभे राहून निवडणूक प्रशिक्षणातील लोकांची प्रतीक्षा केली. तरीसुद्धा प्रशिक्षणातील अधिकारीवर्ग कर्मचाऱ्यांना समजून घेत नाही. 100-150 किलोमीटरवर एवढ्या लांबून आलेला माणूस अजून या ठिकाणी हजेरी पत्रकावर सही करण्यासाठी अर्धा तासपर्यंत प्रशिक्षणातील कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करतो, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
निवडणूक आयोगाने या सगळ्या गोष्टी विचार करणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे जोपर्यंत निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम आनंददायी होत नाही. तसेच जास्त लांब प्रशिक्षण न ठेवता 20 किलो मीटर किंवा तालुका बदल ठेवावा, शिक्षकांच्या वयाचा विचार व्हावा, जोपर्यंत प्रयत्न होत नाही तोपर्यंत निवडणूक प्रशिक्षणाच्या बाबतीत शिक्षकांमध्ये एक धास्तीच राहील. निवडणूक प्रशिक्षणाचे काम झाल्यानंतर कागदपत्रे मशिने जमा करण्यासाठी रात्रीच्या दोन वाजेपर्यंत काहींना ताडकळत थांबावे लागते. आधीच तो दोन दिवसापासून घरापासून लांब असतो आणि प्रशिक्षणातील कर्मचाऱ्यांची आवाजच भाषाशैली साहित्य जमा करताना होणाऱ्या अडचणी, यामुळे निवडणूक प्रशिक्षणात व कागदपत्र जमा करताना पारदर्शकता असणे गरजेचे आहे. जेवढी कागदपत्रे महत्वाची आहेत, तेवढीच निवडणूक प्रशिक्षणातील कर्मचाऱ्यांना बुथवर दिली गेली पाहिजे. तीन फार्मची गरज असते त्यात दहा फार्म दिले जातात. त्याच्यामुळे काहींचा गोंधळ होतो एवढी कागदपत्रे असतात की, काही कर्मचारी ती कागदपत्रे पाहून मनामध्ये एक भीती असते.
ज्या पद्धतीने कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्याच पद्धतीने निवडणूक प्रशिक्षणाचा धसका घेणारी व सेवानिवृत्तीच्या टप्प्यावर आलेले जेष्ठ कर्मचारी काही निवडणूक अधिकारी वर्गाच्या उर्मट व मनमानी कारभाराला कंटाळून शिक्षकांचे आत्महत्या सुरू होतील हे निश्चितच. निवडणूक आयोगाने या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे सध्या जळगाव जिल्ह्यातील निवडणूक प्रशिक्षणात दोन शिक्षकांचा बळी गेल्यामुळे सोशल मीडियावर वृत्तपत्रात अनेक बातम्या आपण वाचल्या ऐकल्या यातून शासनाने व निवडणूक आयोगाने गंभीर पावले उचलून निवडणूक प्रक्रिया त्यात पारदर्शकता कशी येईल याचा विचार करणे गरजेचे आहे.
खुपच छान प्रशिक्षणार्थिच्या अडचणींंना वाचा फोडणारा एक सर्वंकष लेख.