डॉ. ईश्वर पाटील कर्तृत्ववान शिक्षक पुरस्काराने सन्मानित

WhatsApp Image 2019 04 14 at 1.16.48 PM

 

अमळनेर ( प्रतिनिधी)   राणी लक्ष्मीबाई कानिष्ठ महाविद्यालय पारोळा येथील प्रा. डॉ. ईश्वर पाटील यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र यांच्याकडून कर्तुत्ववान शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक कार्य करण्यासोबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत राज्यस्तरीय प्रमुख तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणजे राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक तयार करणे, वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणाच्या समन्वय समिती सदस्य व लेखन समिती सदस्य म्हणून कार्य करत आहे.

 

स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन विविध प्रकारचे कार्य केले. बेटी बचाव बेटी पढाओ, पाणी बचत, एडस दिवस,  योग प्रशिक्षक, गॅस वापर, गांडूळ खत प्रकल्प, गणपती दान उपक्रमात गणपतीच्या मूर्तींपासून खत निर्मिती प्रकल्प यामध्ये भरीव कार्य केलेले आहे. या आधी त्यांना या सर्व कार्याचा विचार करून महाराष्ट्र शासनाने  2018 चा राज्य आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आले होते. डॉ. ईश्वर पाटील यांना कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार वसंतराव मोरे, प्रशासकीय अधिकारी   रोहन मोरे, प्राचार्य  बी. व्ही. पाटील,  पर्यवेक्षक डॉ. वंदना पाटील, उपप्राचार्य, सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी सर्वानी अभिनंदन केले तसेच सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे.

Add Comment

Protected Content