जळगाव प्रतिनिधी । नागरिकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याचे आवाहन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी केले.
अशोकभाऊ जैन यांनी सहकुटुंब मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आम्हाला एकविसाव्या वर्षी अधिकार मिळाला होता. यानंतर सुमारे ३५ वर्षांमधील प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान हे लोकशाहीचे अविभाज्य घटक असून हा पवित्र अधिकार प्रत्येकाने बजावण्याचे आवाहन त्यांनी केले. मोठेभाऊ भंवरलालजी जैन यांनी अनेकदा आजारी असतांनाही मतदान केल्याचे त्यांनी याप्रसंगी नमूद केले. जैन उद्योग समूहात सुमारे दहा हजार कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या कुटुंबियांची संख्या लक्षात घेता, सुमारे ५० हजार नागरिकांनी लोकशाहीच्या या महत्वाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहनदेखील अशोकभाऊ जैन यांनी केले.
पहा : अशोकभाऊ जैन नेमके काय म्हणालेत ते !