जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक चुरसी ठरत आहे. यात सत्ताधारी भाजप आपली सतत अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असून आज त्यांनी आपले काही सदस्य सहलीसाठी अज्ञातस्थळी रवाना केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.
जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या निवासस्थानावर भाजपा जि. प. सदस्यांना आज दुपारी २.०० वाजता बोलवण्यात आले होते. यातील काही सदस्य हे अध्यक्षांच्या बंगल्यावर हजर झाले होते. यानंतर त्यांना अज्ञातस्थळी सहलीसाठी पाठविण्यात आले आहे. जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षांचे ३३ सदस्य आहेत. यापैकी जवळपास २०-२५ सदस्य हे जि. प. अध्यक्ष यांच्या बंगल्यावरून सहलीसाठी दुपारी ४ वाजेच्या सुमारास रवाना झाल्याचे समजते. तर काही सदस्य हे वैयक्तिक कारणास्तव सहलीला गेले नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. या सदस्यांना साहिलीसाठी कुठे नेले जाणार आहे ? याबाबत मात्र गुप्तता पाळली गेली आहे.