मर्सिडीजशिवायही मला पद मिळालं ! : प्रतापराव जाधव

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेनेत पद मिळवण्यासाठी मातोश्रीला दोन मर्सिडीज द्याव्या लागतात, असं वक्तव्य शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केल्यानंतर या वादाला आता नवीन वळण मिळालं आहे. आज केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते प्रतापराव जाधव यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

प्रतापराव जाधव म्हणाले, “मी शिवसेनेचा संस्थापक सदस्य आहे, मला कोणत्याही पदासाठी मर्सिडीज द्यावी लागली नाही.” मात्र, त्यांनी पुढे बोलताना एक सूचक इशारा दिला की, “ज्यांच्यावर कोणतीही शाखा किंवा आंदोलनात पोलिसांची केस नाही, अशांना राज्यसभा किंवा मोठं पद मिळालं तर शंका निर्माण होते.”

त्यांच्या या वक्तव्यातून नेमकं कोणावर निशाणा साधला गेला, हे अस्पष्ट राहिलं आहे. नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण पक्षात उमटत असताना, प्रतापराव जाधव यांच्या या प्रतिक्रियेमुळे हा वाद आणखी चर्चेत आला आहे. आता या प्रकरणाला पुढे काय वळण मिळते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Protected Content