युरोपियन युनियनचे मतदान पूर्ण; ब्रेक्झिटनंतर पहिली निवडणूक

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतातील निवडणुकीनंतर दुसरी सर्वात मोठी निवडणूक युरोपीय संघटनेचे मतदान रविवारी संपले. ब्रिटनने संघातून बाहेर पडल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. सर्वेक्षणात उघड झाले की,मुख्य प्रवाह आणि प्रो युरोपियन पक्ष सत्तेत भलेही येवोत, मात्र त्यांची ताकद कमकुवत होईल. उजव्या पक्षांची ताकद वाढल्यामुळे युक्रेन युद्ध, स्थलांतरितांची समस्या, पर्यावरण बदल व शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर संघटनेचा विचार व निर्णय बदलतील.

संघटनेच्या ७२० सदस्यांच्या निवडणुकीदरम्यान युरोपातील लोक महागाई मुद्दा मानला जात आहे. महागाईला मुद्दा मानण्याचा लोकांचा कल उजव्या पक्षांकडे दिसत आहे. त्यांच्या योजना महागाई कमी करतील. संघटनेसमोर चीनचेही आव्हान व ट्रम्प पुन्हा अमेरिकी अध्यक्ष होण्याचीही शक्यता आहे.युरोपीय संघटनेच्या निवडणुकीत युरोपातील सर्व देशांच्या मतदारांना या वेळी सर्वात मोठी चिंता सुरक्षेची आहे. २७ देशांच्या युरोपीय संघटनेत सुमारे ३७.३ कोटी मतदार आहेत. १६ वर्षांवरील सर्वांना मतदानाचा अधिकार आहे.

Protected Content