रावेर तालुक्यात अडीच कोटींच्या नुकसानीचा अंदाज

रावेर  प्रतिनिधी । रावेर तालुक्यात वादळी पावसामुळे २ कोटी ५५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली असून आज आमदार शिरीष चौधरी,आमदार चंद्रकांत पाटील आणि प्रांतधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी  नुकसानीची  पाहणी केली. 

काल तालुक्यात झालेल्या वादळी पावसा मुळे झालेल्या नुकसानी प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे.यामध्ये ३८ गावांमधील १ हजार १२५ हेक्टर वरील १४१८ शेतकर्‍यांचे ज्वारी,मका,तुर,कापूस,केळीचे २ कोटी ५५ लाख ३१ हजार २५५ रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्रभारी तहसिदार संजय तायडे यांनी दिली आहे.

दरम्यान, आज आमदार शिरीष चौधरी,आमदार चंद्रकांत पाटील आणि प्रांतधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी  नुकसानीची पाहणी केली आहे.

Protected Content