धरणगावला लागून डॉ. हेडगेवार नगर गावाची स्थापना

Hedgewar

जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यातील धरणगाव या तालुक्याचे गाव असलेल्या गावातील महसूली हददीत असलेल्या मात्र धरणगाव नगरपालिका हददीत समाविष्ट नसलेल्या क्षेत्रासाठी डॉ. हेडगेवार नगर या नावाने स्वतंत्र महसूली गाव स्थापन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी कळवली आहे.

 

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून काल (दि.२०) प्राप्त झालेल्या दुरध्वनी संदेशानुसार तत्काळ हा आदेश देण्यात येत असल्याचे या संबंधातील पत्रात म्हटलेले आहे. या भागासाठी डॉ. हेडगेवार नगर या नावाने स्वतंत्र महसूली गाव स्थापन करण्याचा प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४ चे पोटकलम (४) नुसार डॉ. हेडगेवार नगर महसूली गाव स्थापन करण्यासाठी प्रारूप अधिसुचना दि.२०-०९-२०१९ रोजी निर्गमित करण्यात आलेली आहे. त्यामुळे या नव्या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, असेही या पत्रात म्हटले आहे.

वरील बदल केल्याने ज्यांच्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तींना सूचना देण्यात येत आहे की, ज्यांना कोणाला हरकत घ्यावयाची असेल किंवा सुचना करावयाची असेल, त्यांनी सदरची हरकत किंवा सूचना योग्य त्या कारणांसह लेखी स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे दाखल करायची आहे, असेही त्यात म्हटले आहे.

Protected Content