जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था असावी व जळगाव जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज पुरवठा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन जळगाव जिल्हा शासकीय आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली.
या पतसंस्थेची पहिली बैठक जिल्हा उपनिबंधक अधिकारी मनोज खवळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून महेंद्र गाढे उपस्थित होते. सदरप्रसंगी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, स्विकृत सदस्य व तज्ञ संचालक यांची निवड करण्यात आली. चेअरमनपदी विलास कोळी व व्हाईस चेअरमनपदी अतुल सोनवणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
संचालक म्हणुन डाँ.देवराम लांडे, प्रकाश पाटील, गजानन काकडे, राहुल लाडवंजारी, इंदिरा सोनवणे, धनराज सोनवणे, संजय सोनार, शांताराम पाटील, हंसराज महाजन, प्रमोद रगरे यांचे निवड करण्यात करण्यात आली. स्विकृत संचालक म्हणुन मनोज कंखरे तर तज्ञ संचालक म्हणुन प्रदिप बोरसे यांची निवड करण्यात आली.
सदरप्रसंगी संस्थेचे चेअरमन विलास कोळी यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, आरोग्य कर्मचाऱ्यांची पतसंस्था असावी हा विचार करुन तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आज आपण पतसंस्थेची निर्मिती केली आहे.पतसंस्थेमार्फत सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन सभासदांना 8 टक्के दराने कर्ज पुरवठा केला जाणार आहे.तसेच संचालक मंडळ कुठल्याही प्रकारचा भत्ता घेणार नाही.तरी सभासद हित जोपासुन जास्तीत-जास्त आरोग्य कर्मचारी आपल्या पतसंस्थे सभासद बनविण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले.आज रोजी संस्थेचे 270 सभासद आहे.आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्यावर जो विश्वास दाखविला आहे. त्या विश्वासाला कुणीही तडा जावु नये. म्हणुन प्रयत्न करावे.
व्हाईस चेअरमन अतुल सोनवणे यांनी सांगितले की संस्थेच्या मार्फत सभासदांचा अपघाती विमा व मेडिक्लेम काढला जाणार आहे.तसेच संस्थेचा कारभार पारदर्शी ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.असे आवाहन त्यांनी केले.संस्थेचे संचालक गजानन काकडे यांनी संस्थेसाठी 15 हजार रु.ची.स्टेशनरी घेऊन दिली.त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सदरप्रसंगी युवराज सोनवणे, कोळी नाना, भिकाभाऊ सपकाळे, अतुल माळी, पंकज तायडे, रविंद्र पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संस्थेचे तज्ञ संचालक प्रदिप बोरसे यांनी केले. आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक संजय सोनार कळवाडीकर यांनी केले.