फैजपूर येथे चरणविंद छत्रीची स्थापना

chhantri

फैजपूर प्रतिनिधी । येथे सद्गुरु स्मृति महोत्सव २०१९ आणि अ.नि.प.पु.सद्गुरु शास्त्री निलकंठदास जन्म शताब्दी महोत्सवानिमित्त स्वामिनारायण भगवान यांच्या चरणविंद छत्रीची स्थापना आज (दि.३) करण्यात आली.

प.पु.सद्गुरु शास्त्री धर्मप्रसाददास, शा.भक्तिप्रकाश दासजी, शा.भक्तिस्वरूप दास समस्त यजमान व स्वामिनारायण मंदिर न्हावी येथील ट्रस्टी मंडळ यांच्या हस्ते छत्रीची स्थापन करण्यात आली. या कार्यक्रमात प.पु.स.गु.शास्त्री भक्तिप्रकाशदास यांचे आशिर्वचनन झाले. त्यांनी सांगितले की, मनुष्याला मोक्ष कसा प्राप्त होतो, तसेच सेवा केल्यास प्राप्त होणाऱ्या फळाचे महत्त्व सांगितले. त्यानिमित्त श्रीजी चरणारविन्द खाली वही स्थापन सोहळ्यात कार्यक्रमाच्या सुरुवातीला भव्यदिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्हावी येथील महिला भजनी मंडळ व पुरुष भजनी मंडळ व न्हावी परिसरातील सर्व हरिभक्त मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी प.पु.स.गु.शास्त्री भक्तिस्वरुपदास, प.पु.स.गु.शास्त्री धर्मप्रकाशदास, स्वामी हरिप्रकाशदास, समस्त यजमान व परिसरातील हरिभक्त उपस्थित होते.

Protected Content