Home Cities एरंडोल एरंडोल येथे मान्यवरांनी केले मतदारांना आवाहन (व्हिडीओ)

एरंडोल येथे मान्यवरांनी केले मतदारांना आवाहन (व्हिडीओ)


Erandol 1

एरंडोल (वृत्तसंस्था) एरंडोल येथे आज मतदारांनी सकाळ पासूनच उत्साहाने मतदान केले. यात अनेक मान्यवरांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये विद्यमान नगराध्यक्ष रमेश परदेशी, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. मनोज पाटील आदी नेत्यांचा समावेश होता.

यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी सांगितले की, हे लोकसभेचे मतदान असून आपण पंतप्रधान निवडण्यासाठी मतदान करीत आहात, त्यामुळे चांगले काम करणाऱ्यांना मतदान करा. भारतासारख्या मोठ्या देशात लोकशाही मजबूत करण्यासाठी मत देवून काम करणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या. माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांनी म्हटले की, राष्ट्राच्या हितासाठी व विकासासाठी मतदानाचा हक्क बजावा. तसेच प्रा. मनोज पाटील यांनी आवाहन केले की, एरंडोल शहरातून जास्तीत-जास्त मतदान व्हावे, अशी माझी विनंती आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound