एरंडोल प्रतिनिधी । शहरातील आठवडे बाजारात प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी स्वत: ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनबाबत जनजागृती केली. यावेळी नागरीकांचे शंकांचे निरसन केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ सप्टेंबर पासुन एरंडोल विधानसभांतर्गत असलेल्या गर्दी व वर्दळच्या ठिकाणी तसेच प्रत्येक मतदान केंद्राच्या गावी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बाबत जनजागृती करण्यासाठी एरंडोलचे प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत स्वतः शहरातील येथील आठवडे बाजारात उभे राहुन लोकांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन बद्दल जनजागृती केली. यावेळी त्यांनी प्रत्येक व्यक्तीला मशीनबद्दल योग्य ती माहिती देऊन लोकांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी सोबत नायब तहसीलदार अहिरे, नंदकिशोर शिंदे, तलाठी विश्वंभर शिरसाठ, विलास धाडसे, दिपक ठोंबरे यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थित होते.