एरंडोल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एरंडोल शहरवासियांसाठी राज्य शासनाने अमृत २.० योजनेच्या अंतर्गत तब्बल २९ कोटी ७९ लक्ष रूपयांची तरतूद असणारी पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या माध्यमातून आमदार चिमणराव पाटील यांनी केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला आहे.
याबाबत वृत्त असे की, एरंडोल शहरात अनेक दशकांपासूनच्या नगरपरिषदेच्या पाईप व्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा, म्हसावद रस्त्यापलिकडील नविन वसाहतींमध्ये अपुर्ण पाईप, पाईपलाईन असुन पाणी कमी दाबाने पाणी मिळणे, उत्तम नगर सारख्या ५०० ते १००० लोकांचा वस्तीत पाईप नसने यांसह अनेक समस्यांनी नागरीक हैराण झाले होते. अनेक भागात १००० ते २००० लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमध्ये पाईपलाईनची कुठलीच व्यवस्था नसल्याने या नागरीकांची पाण्यासाठी मोठी वणवण होत होती.
दरम्यान, आमदार चिमणराव पाटील यांचेकडे दैनंदिन पाण्याबाबत समस्या येतच होत्या. याची आमदार चिमणराव पाटील यांनी तातडीने दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांचेकडे यांचेकडे पाठपुरावा सुरू केला. याची राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी दखल घेत संबंधित अधिकर्यांना सुचना करून एरंडोल शहराचा पाणीपुरवठा योजनेस मंजुरी देण्याबाबत आदेशित केले.
त्याअनुषंगाने आज नगरविकास विभागाच्या शासन निर्णय क्रमांक अमृत-२०२२/प्र.क्र.२६८/नवि-३३ दि.०२ नोव्हेंबर २०२२ रोजीचा आदेशान्वये अमृत २.० अभियान अंतर्गत एरंडोल नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा प्रकल्पास मंजुर देण्यात आली. काही दिवसांपुर्वीच पारोळा शहराचा ५३.७० कोटी रूपयांचा पाणीपुरवठा योजनेस मंजुरी देण्यात आलेली होती. तर आता एरंडोल शहराचा २९.७९ कोटी रूपयांचा मंजुरी पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाली आहे. यामुळे दोनही शहरांचा पाणी प्रश्न १००% मार्गी लागल्यामुळे आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.
यावेळी येत्या महिन्याभराचा आत या दोनही शहरांचा पाणीपुरवठा योजनेचा कामाचे मुख्यमंत्री महोदयांचा शुभहस्ते भुमिपुजन करून प्रत्यक्षात कामाची सुरूवात होणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले. यास्तव या शहरांचा समस्यांचा श्वास असलेला पाणीप्रश्न आता कायमचाच दुर होणार असल्याने दोनही शहरवासीयांनी आमदार चिमणराव पाटील यांचे आभार मानले आहेत.