Home Cities एरंडोल दुचाकींची समोरासमोर धडक; दोन युवक ठार

दुचाकींची समोरासमोर धडक; दोन युवक ठार

0
35

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल ते धरणगाव रस्त्यावर शनिवारी रात्री दोन दुचाकींच्या समोरा-समोर झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, एरंडोल ते धरणगाव रस्त्यावरील ओमनगर जवळ दुचाकी (एमएच- १९, बीटी- ९०३६) व दुसरी दुचाकी (एमएच- १९, बीझेड – ४२९८) या भरधाव वेगाने जाणाार्‍या मोटरसायकलींची शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या समोरासमोर धडक झाली. या अपघातात गणेश भानुदास महाजन (वय २२) व धरणगाव येथील गणेश प्रकाश बोरसे (वय ३४) हे दोन्ही युवक जागीच ठार झाले. या अपघातात प्रकाश दगडू बोरसे हे गंभीर जखमी झाले आहेत. ते मृत गणेश बोरसे यांचे वडील असून ते आपल्या मुलाच्या दुचाकीवरून धरणगाव येथे जात होते. दरम्यान, यातील दुसरे मृत गणेश महाजन हे खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होतेे.


Protected Content

Play sound