Home Cities एरंडोल एरंडोल नूतन आठवडे बाजाराचे ‘संत शिरोमणी सावता माळी’ नामकरण करा – सामाजिक...

एरंडोल नूतन आठवडे बाजाराचे ‘संत शिरोमणी सावता माळी’ नामकरण करा – सामाजिक संस्थांची मागणी

0
129

एरंडोल प्रतिनिधी | एरंडोल नगरपरिषदेच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या नूतन आठवडे बाजाराचे ‘संत शिरोमणी सावता माळी आठवडे बाजार’ असे नामकरण करा. या मागणीचे निवेदन शहरातील विविध सामाजिक संस्थांनी एरंडोल नगराध्यक्ष यांच्याकडे दिले.

एरंडोल नगरपरिषदेच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या नूतन आठवडे बाजाराचे ‘संत शिरोमणी सावता माळी आठवडे बाजार’ असे नामकरण करा. या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी व मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे नगरसेविका आरती महाजन यांनी आणि शहरातील तेली समाज, माळी समाज व विविध सामाजिक संस्थांनी दिले आहे.

याप्रसंगी नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी यांनी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन लवकरच नगरपरिषदेची विषेश सभा बोलवून या संबंधीचा ठराव मंजूर करण्यात येईल अशी ग्वाही दिली. निवेदन देते वेळी नगरसेवक योगेश महाजन, जहिरुद्दीन शेख, नितीन महाजन, जयश्री पाटील, माजी नगरसेवक नरेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound