एरंडोल प्रतिनिधी । म्हसावद येथील व्यक्तीने जळगाव येथील एकास शेतीच्या व्यवहारात फसविले असल्याची तक्रार एरंडोल पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस स्टेशन वरून मिळालेली माहिती अशी की दगडू गुलाब पठाण (राहणार म्हसावद) यांच्याकडून कुंदन दगडू देसले (राहणार मायदेवी नगर, जळगाव) यांनी दि.८/१/२०१६ रोजी शेत गट नं ४२१ ची रजि.प्रांत कार्यालय येथून खरेदी केली होती. तीच शेती दगडू पठाण याने ५/२/२०१६ रोजी संतोष शामराव तायडे यांना लिहुन दिली. यामुळे कुंदन देसले यांची फसवणुक झाल्याने एरंडोल पो.स्टे. ला दगडू पठाण यांचे विरोधात कुंदन देसले यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षल कुलकर्णी करीत आहेत.