चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतला प्रशासनाच्या वतीने शहरातील धुळे रोडवरील शासकिय दुध डेअरीच्या बाजूला असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले आरोगय संकुलात सुसज्ज कोविड केअर सेंटरचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार ईश्वर जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील शिवसेना तालुका प्रमुख रमेश चव्हाण, उमंग महिला अध्यक्षा संपदा पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.पी.बाविस्कर, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, शिवसेनेचे तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, चारुदत्त पवार, दिनेश विसपुते, शैलेंद्र सातपुते, तुकाराम पाटील, रामेश्वर चौधरी, संजय पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिनेश पाटील अशोक खलाने तालुका आरोग्य अधिकारी देवराम लांडे, बांधकाम विभागाचे नवनाथ सोनवणे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3230066623754543/