रावेरमध्ये विश्ववेध फाउंडेशनच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील विश्ववेध फाउंडेशनच्या वतीने रावेर तालुक्यात आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या उपक्रमात सुमारे ३०० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते संदीप सावळे आणि माजी उपसभापती धनश्री सावळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वी झाला.

रावेर शहरातील माजी सैनिक हॉलमध्ये माधवबाग हॉस्पिटल, खोपोली आणि विश्ववेध फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन भाजप प्रदेश सदस्य सुरेश धनके आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा सरचिटणीस हरलाल कोळी, लोकसभा प्रमुख नंदकिशोर महाजन, तहसीलदार बंडू कापसे, माजी तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, तालुका उपाध्यक्ष वासू नरवाडे, शहराध्यक्ष दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या आरोग्य शिबीरात डॉ. अमित पाटील, डॉ. श्रेयस महाजन, डॉ. मेने आणि डॉ. तुषार पाटील यांनी हृदय, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांवर तपासणी करून रुग्णांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे आयोजन आणि व्यवस्थापन विश्वजीत सावळे, आशा सपकाळे, स्वप्नील सोनवणे, चंदू पाटील, सागर चौधरी, जितू सावळे, प्रमोद वानखेडे, आणि साई राठोड यांनी केले.

उपक्रमाचे कौतुक:
या शिबिरामुळे रावेर तालुक्यातील नागरिकांना महत्त्वाच्या वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता आला. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी फाउंडेशनचे कौतुक केले. भविष्यात अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली.

Protected Content