Home Cities भुसावळ टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये भुसावळच्या धावपटूंचा उत्साहपूर्ण सहभाग

टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये भुसावळच्या धावपटूंचा उत्साहपूर्ण सहभाग


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रोकॅम या संस्थेद्वारा आयोजित व टाटा सन्स प्रायोजित मुंबई मॅरेथॉनच्या २०व्या पर्वात ६ किमीचा ड्रीम रन, १० किमीचा चॅरिटी रन, २१ किमीची अर्ध मॅरेथॉन व ४२ किमीची पूर्ण मॅरेथॉन या सर्व गटात ६२००० हुन अधिक धावपटूंनी सहभाग घेतला होता. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. या स्पर्धेत भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या ४० धावपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविला.

२१ किमीची अर्ध मॅरेथॉन माहीमच्या रेती बंदर येथून तर इतर सर्व स्पर्धा मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरु होऊन वरळीच्या सी लिंक वरून धावत जाऊन सर्व स्पर्धक आपापले निर्धारित अंतर पूर्ण करून आझाद मैदानावर परतले त्यावेळी कित्येकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते तर पदक गळ्यात पडताच आपण केलेले कष्ट फळाला आल्याची कृतार्थ भावना प्रत्येक धावपटूच्या आनंदी चेहऱ्यावर जाणवत होती. यावेळी अतिशय उष्ण व विषम वातावरणामुळे देखील हि स्पर्धा सर्व धावपटूंच्या लक्षात राहील. जगातील पहिल्या १० व भारतातील अव्वल क्रमांकाच्या या मॅरॅथॉनमुळे मुंबईमध्ये धावणाऱ्यांचा महाकुंभ आयोजित केला आहे कि काय असे जाणवत होते. या जागतिक स्पर्धेत भुसावळच्या धावपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविल्याबद्दल असोसिएशनचे प्रमुख प्रा प्रविण फालक यांनी आनंद व्यक्त केला. शहरातील बहुसंख्य नागरिकांनी यशस्वी धावपटूंचे अभिनंदन केले.

सहभागी धावपटू पुढीलप्रमाणे:

४२ किमी: डॉ तुषार पाटील, विजय फिरके, राजेंद्र घाटे, जितेंद्र चौधरी, प्रविण वारके,युवराज सूर्यवंशी,रोशन बाळसराफ,सुरेश सहानी,संतोष मोटवानी,निलेश पाटील,विलास पाटील, मोहन देशपांडे, उमेश घुले
२१ किमी: डॉ नीलिमा नेहेते,डॉ चारुलता पाटील, माधुरी चौधरी, विनिता शुक्ला,डॉ वर्षा वाडिले, माया पवार, पूनम भंगाळे, किर्ती मोटळकर, एकता भगत, मंगेश चंदन, रमेशसिंग पाटील, सारंग चौधरी,सचिन मनवानी, कैलास छाब्रा,प्रकाश अटवानी, दिपक पाटील, डॉ निलेश भिरूड,निखिल गुप्ता, प्रविण पाटील
१० किमी: चित्रा करकरे, लवली पवार, मधुकर इंगळे, डॉ जगदीश अत्तरदे, दिलीप जोनवाल, डॉ सुयोग तन्नीरवार, तेजस चौधरी
६ किमी: संजय मोटळकर, जनार्दन जाधव


Protected Content

Play sound