अमळनेर प्रतिनिधी । महाविद्यालयीन जीवनाची आठवण करून देत तब्बल 30 वर्षांनंतर एकत्र आलेल्या प्रताप महाविद्यालयातील बी.कॉम 92 बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा खूपच रंगला.
शहरातील अंबर्षी टेकडीच्या निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या प्रताप कॉलेजच्या सन १९९२ च्या बॅच मधील बी. कॉम विद्यार्थ्यांनी एकत्र येत व्हॉटसअप वर ग्रुप तयार केला होता. या ग्रुप चे अॅडमीन असलेले अविनाश शिरसाठ यांच्या संकल्पनेतून वर्गातील सर्व मित्रांचे स्नेह संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांनी प्रास्ताविक करतांना आपली मैत्री चिरकाल टिकेल असा आशावाद व्यक्त केला. स्नेहसंमेलनात सहभागी होण्यासाठी राज्य व राज्याबाहेर स्थायिक झालेले सर्व वर्ग मित्र एकमेकांचा भेटल्यावर हास्यविनोद करून जुन्या आठवणीत चांगलेच रमले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस दिवंगत झालेले वर्ग मित्र बी.आर. अवसर मल,विंचूरकर,कसबे,प्रवीण देशपांडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर रंगलेल्या स्नेहसंमेलनात सर्वच मित्रांनी कॉलेज मधून बाहेर पडल्यानंतर सुरू केलेले व्यवसाय, नोकरी व अपापापल्या कुटुंबाची माहिती सांगितली. यावेळी भारत ससाणे यांनी आपले विचार व्यक्त करतांना तोंड उघडले तर अनेक मित्रांची पोल उघड होईल असे सांगून मित्रांची फिरकी घेतली.नरेश पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना एकमेकांचा संपर्क असाच कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली. नगरसेवक राजेश पाटील यांनी मैत्रीचा धागा हा मन जुडवणरी विण आहे. असे सांगितले. जगदीश बारी यांनी आपली प्रशासकीय जबाबदारीत मित्रांची आठवण काम करण्याची ऊर्जा देते असे सांगितले.
यावेळी हिरेन नागडा यांनी सर्व मित्रांना स्मृतिचिन्ह व ‘मी असा’ हा काव्य संग्रह भेट दिला. यावेळी गाणे, विनोद, दंगा मस्ती करत सर्वच मित्रांनी सामूहिक नृत्य करून आनंदाचा जल्लोष केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतन शहा यांनी तर आभार प्रशांत बडगुजर यांनी मानले. स्नेहसंमेलनाचे नियोजन संजय वाणी खूप चोख केले.
यावेळी डी.के.जैन, गणेश पाटील, हरीश भदाणे, शशी पाटील, राकेश माहेश्वरी, सुनील बोंडे, प्रवीण चुडीवाले, चेतन पाठक, संजय शिंपी, नवनीत पाटील, प्रवीण मोराणकर, विनायक कुलकर्णी, बंडू देशमुख, लिनेश शहा, हरीश माधवानी, ईश्वर पाटील, विलास परदेशी, किशोर शिंपी, प्रकाश जैन, नीलेश जैन, प्रकाश थोरात, अनिल झाबक, अजय पोरवाल, लक्ष्मण जिवनानी, राजेश जैन, सुभाष महाजन, मनीष शहा, विपुल शहा, नितीन राणे, विनोद जैन, विजय गोलेच्छा, संजय जैन, महेश लधानी, विजय अमृतकार आदी मित्र स्नेहसंमेलनात सहभागी झाले. पुन्हा भेटू असा संकल्प करत मित्रांनी सर्वांचा निरोप घेतला.