जळगाव, प्रतिनिधी | शालेय, महाविद्यालयीन तरुणींसह महिलांकरिता सार्वजनिक दहीहंडी उत्सव शहरात प्रथमच साजरा करण्यात येणार आहे. यासाठी महिलांची गोपिका पथके बनविण्याचे काम सुरु आहे.
या दहीहंडीमध्ये सहभागी होण्यासाठी रविवारी १८ ऑगस्ट पर्यत तरुणींनी आणि महिलांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. युवाशक्ती फौंडेशन, विद्या इंग्लिश मिडीयम विद्यालय, ज्ञानयोग वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात गोपिकांची दहीहंडी पथके बनविणे सुरु झाले आहे. पथकांमध्ये सर्व तरुणी, महिलांसाठी खुला प्रवेश असून पुरुषांसह महिलांचा दहीहंडी उत्सवात सहभाग वाढावा हा यामागील प्रमुख उद्देश आहे. २४ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. मुंबई येथून विशेष प्रशिक्षक हे प्रशिक्षण देण्यासाठी येणार आहेत. अनेक तरुणींमध्ये दहीहंडी फोडणाऱ्या मानवी मनो-यांमध्ये सहभागी होण्याची इच्छा असते. मात्र त्यांना योग्य संधी मिळत नाही. या उत्सवात, जल्लोषपूर्ण वातावरणात सहभागी होण्यासाठी रविवारी १८ रोजी संध्याकाळी ५ वाजता विद्या इंग्लिश मिडीयम विद्यालय, शिवाजी उद्यान रोड, डी मार्ट समोर येथे उपस्थित राहावे. इच्छुक तरुणींनी हेतल पिपरिया, ज्ञानयोग वर्ग, विसनजी नगर ( ९४२३९०३७११), संजय चव्हाण, विद्या इंग्लिश मिडीयम स्कूल (८७८८८८९७११) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.