एरंडोल प्रतिनिधी । येथील बीआरसीचा सभागृहात आज दि. 19 जुलै रोजी शिक्षकांची सहविचार सभा संपन्न झाली आहे.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गटशिक्षणाधिकारी मा. चौधरी होते. तसेच सभेसाठी तालुक्याचे सर्व क्रीडा शिक्षक हजर होते. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा कार्यक्रम निश्चित करणात आला. यावेळी स्पर्धा आयोजनाबाबत सुचना देखील देण्यात आल्या असून या स्पर्धत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन रजिट्रेशनबाबत प्रा.मयुर जाधव यांनी माहिती दिली. व क्रिडा संकुलात वृक्षारोपण करण्यासाठी सर्वांन आव्हान करण्यात आले. सभेसाठी अजय साळी, आर.एस महाजन, डि.के.पाटील, आय.टी सैयद, पी.डी मराठे, सि.डी.पाटील, पी.जी.कोळी, एस.एच.पाटील, डी.बी.पाटील, पी.पी.पाटील, युसूफ खान, एस.एस.पाटील, ई.क्रीडा शिक्षक उपस्थित होते. यावेळी तालुक्याचे क्रिडा समन्वयक प्रा. मनोज पाटील यांनी सुत्रसंचालन तर आभार डी.एस.पाटील यांनी मानले.