अभियंत्यांनी विश्वेश्वरय्या यांच्या आदर्शांवर चालावे – डॉ. कुंदन फेगडे

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतातील सर्व अभियंत्यांचे प्रेरणास्थान, निष्ठावान, चारित्र्यवान, विशाल दृष्टिकोन असलेले अभियंता भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या देशाच्या विकासासाठी मोठ्या योगदानाचा उल्लेख डॉ. कुंदन फेगडे यांनी केला.

रावेर परिसरात अभियंता भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रेरणेने इंजिनियर्स डे साजरा केला जातो. यानिमित्त रावेर येथे रावेर-यावल इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने अभियंत्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात इंजि. प्रकाश कोल्हे, इंजि. धीरज मिसर, इंजि. विकास धनगर, इंजि. निलेश मालेगावकर, इंजि. मयूर कासार, इंजि. राजेश सोनवणे, आणि इंजि. सोनू महाजन यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

या वेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, शहराध्यक्ष दिलीप पाटील, इ जे महाजन, आणि भास्कर बारी उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. फेगडे यांनी अभियंता विश्वेश्वरय्या यांच्या जीवनकार्याचा गौरव केला आणि उपस्थित अभियंत्यांना त्यांच्या आदर्शांवर चालण्याचे आवाहन केले. सत्कार समारंभात अभियंत्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला आणि त्यांनी देशाच्या विकासात आपले योगदान देण्याची प्रतिज्ञा केली.

Protected Content