जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील जाडगाव येथील गट नंबर १२४ मधील अनिल रंभाजी फुलगावकर यांच्या शेतात सुरेश भिका वंजारी यांनी अनधिकृतपणे शेतातील बांध व बंधारा तोडून शेतात अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण बेकायदेशीर असून याची चौकशी करून न्याय मिळावा या मागणीसाठी शेतकरी अनिल फुलगावकर यांनी बुधवार १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपासून परिवारासह शहरातील जी.एस. मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असा पवित्रा कुटुंबातील सदस्यांनी घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील जाडगाव येथील रहिवासी असलेले अनिल फुलगावकर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यांचे भुसावळ तालुक्यातील जाडगाव शिवारातील गट नंबर १२४ मध्ये शेत आहे. त्यांच्या शेतासमोरील शेतकरी सुरेश भिका वंजारी यांनी अनधिकृतपणे अनिल फुलगावकर यांच्या शेतातील बांध व नाला तोडून त्यांच्या शेतात अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण बेकायदेशीर असून ते तातडीने काढण्यात यावे या मागणीसाठी पीडित शेतकरी अनिल फुलगावकर यांनी जळगाव शहरातील जी.एस. मैदानात बुधवारी १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपासून परिवारासह बेमुदत उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण सोडवले जाणार नाही. असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.