धरणगाव प्रतिनिधी । येथील चोपडारोड महामार्गवरील पाटाजवळ खाजगी जमिनी समोर बळजबरीने केलेले अतिक्रमण हटविण्यासाठी संबधित दोन अतिक्रमणधारकांना सा.बा. विभाग मार्फत नोटिस देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे अतिक्रमण हटवले जाण्याची चर्चा सुरु झाली आहे.
चोपडा रोडलगत न.पा. विकास आराखड्यात सिधुबाई तुळाशीराम माळी यांची खाजगी शेतजमीन आहे. या क्षेत्रात.व शेतासमोर राष्ट्रीय महामार्ग लगत दोन जणांनी बळजबरीने अतिक्रमण केले. या वृद्ध महिलेने तहासिलदार यांचाकडे त्क्रार अर्ज सादर केला होता. अर्जाची चौकशी करून जमिन मालकाचा बाजुने निर्णय देवुन तात्काळ संबधित कार्यालयाकडे तक्रार करण्याचे निर्देश दिले त्या अनुशंगाने न.प. मुख्याधिकारी व उपअभियंता (सा.बा. विभाग धरणगांव) यांच्याकडे तक्रार दिली. त्या तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर ते खाजगी शेत गटासमोरील शेताला तसेच मुख्य रस्ताला बाधित करणारे अतिक्रमण हटाविण्यासाठी सा.बा. विभागामार्फत संबधीत दोन आरिक्रमणधारकांना जागा मोकळी करून देण्याची नोटीस देण्यात आली आहे.