जळगावातील तांबापुरात अतिक्रमण हटाव मोहीम

जळगाव : वासिम खान

शहरातील संवेदनशील मानल्या जाणाऱ्या तांबापुरा भागात आज सकाळपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरु आहे. घटनास्थळी मोठा फौजफाटा असल्यामुळे या परिसरात काहीतरी तणाव निर्माण झाल्याची अफवा पसरली होती. परंतु महापालिकेचा अतिक्रमण विभाग शांतेत अतिक्रम काढत असल्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जळगाव शहरातील तांबापुरा परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो. त्यामुळे येथे काहीही घडले तर त्याची चर्चा संपूर्ण जळगाव शहरात पसरते. आज सकाळी मनपाचा अतिक्रमण विभाग तांबापुरातील मच्छी बाजार ते शिरसोली नाका या भागातील अतिक्रमण काढत आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जळगाव विभागीय पोलीस अधिकारी निलभ रोहन यांच्यासह शहरातील सर्व चारही पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी या ठिकाणी थांबून आहेत. परंतु तांबापुरा भागात काहीतरी तणाव निर्माण झाल्याची अफवा पसरवण्यात येत आहे. दरम्यान, तांबापुरा परिसरात शांततेत अतिक्रण काढण्याचे काम सुरु असून कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content