Home Cities जामनेर पहूर येथे सरस्वती प्ले स्कुलचे स्नेहसंमेलन उत्साहात

पहूर येथे सरस्वती प्ले स्कुलचे स्नेहसंमेलन उत्साहात


पहूर ता.जामनेर ( वार्ताहर) तालुक्यातील सुर्यदीप शिक्षण प्रसारक मंडळ शेंदुर्णी संचलित सरस्वती प्ले स्कूल पहुर शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक व्हावे, यासाठी स्नेहसंमेलन व विविध स्पर्धांमधील विजयी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन येथील चंदन कुमावत मंगल कार्यालयात नुकतेच करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन शेंदुर्णी येथील लोकनियुक्त नगराध्यक्षा विजयाताई खलसे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून शेंदुर्णी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल, ज्येष्ठ नेते अमृत खलसे, माजी जिल्हापरिषद सदस्य राजधर पांढरे, शेंदुर्णी नगरपालिकेचे नगरसेवक श्याम गुजर, निलेश थोरात, पत्रकार गणेश पांढरे, अंबादास चोपडे व संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गुजर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतमाता व सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शाळेतील विविध स्पर्धेत विजयी विद्यार्थी व माता पालक यांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप गुजर तर सूत्रसंचालन गुजर मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आबा पाटील, भीमराव बोराडे, दिगंबर सटाले, विनोद पाटील, बाळू शिरसागर, संतोष पाटील तसेच शाळेतील शिक्षिका ऋतुजा पाटील, पूजा सुरवाडे, प्रियांका घोंगडे, कोमल जाधव, प्रियंका बोदडे शुभांगी पारखे शुभांगी चौधरी प्रज्ञा पाटील आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास पहुर परिसरातील ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound