दहीगाव येथे महिलांच्या सार्वजनिक शौचालयात घाणीचे साम्राज्य

dahigaon

 

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथील सुरेश आबा नगरात महिलांसाठी असलेल्या सार्वजनिक शौचालय हे गेल्या अनेक महिन्यांपासून स्वच्छ न झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला. यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विरावली रस्त्यालगत असलेल्या सुरेश आबा नगरजवळील महिलांचे सार्वजनिक शौचालय ग्रामपंचायतीने बांधलेले आहे. या शौचालयात सांडपाण्याची सुविधा नाही. शौचालयात साफसफाई होत नाही. शौचालयाच्या परिसरात प्रचंड प्रमाणात झुडपे वाढलेली आहेत. याच ठिकाणी मोठ-मोठे साप महिलांच्या निदर्शनास येत असतात. या भितीमुळे माहिला शौचालयात न जात उघड्यावर जातात. याचबरोबर परिसरात पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे शौचालयाअभावी अखेर त्यांनाही उघड्यावर शौचास बसावे लागत आहे. याठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण होत असून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासनाची स्वच्छता मोहीम मात्र येथे मार खात आहे. अनेक वेळा गावकऱ्यांनी प्रशासनाला तोंडी व ग्रामसभेत ही हा प्रश्न विचारले असताना तात्पुरती ग्रामस्थांची मनोधारणा प्रशासनाने केलेली आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून ही बाब गंभीर असून वरिष्ठांनी लक्ष द्यावे. अन्यथा सुरेश आबा नगरातील महिला यावल किंवा जळगाव जिल्हा परिषदेवर धडकणार असल्याचा इशारा महिला वर्गाने दिलेला आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक शौचालय नसल्याने वर्ग प्रशासनावर संताप व्यक्त होत आहे. गावात शौचालय शासनामार्फत बांधण्यात आले आहेत. मात्र या शौचालयांचा किती कुटुंब उपयोग घेत आहेत. याचीही चौकशी करण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे.

Protected Content