नागरिकांचा वेड इन इंडिया संकल्पनेवर भर : पंतप्रधान मोदी

जयपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जयपूरमध्ये ९ ते ११ डिसेंबर दरम्यान होणार्‍या ‘रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट’चे उद्घाटन केले. या सम्मेलनाचा उद्देश राजस्थानमधील गुंतवणूक वाढीस चालणे देणे हा असून या सम्मेलनात अनेक देशांचे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय संघटना देखील सहभागी झाल्या आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ‘वेड इन इंडिया’ घोषणेचा राज्यातील पर्यटन वाढण्यास फायदा होईल असे मत मोदींनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागील काही काळापासून वेड इन इंडिया संकल्पनेवर भर देताना दिसत आहेत. देशातील नामांकित जोडपी लग्न सोहळा परदेशात आयोजित करतात. त्यानंतर सरकारकडून वेड इन इंडियाचा प्रसार केला जात आहे. याअंतर्गत बाहेरच्या देशात होणारे भारतीयांचे लग्न समारंभ देशातच केले जावेत, जेणेकरून भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होईल असे आवाहन केले जात आहे.

राजस्थानमधील पर्यटनाच्या वाढीबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी यांनी याबद्दल भाष्य केले आहे. सम्मेलनात उपस्थित गुंतवणूकदारांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मी देशातील नागरिकांना ‘वेड इन इंडिया’चे आवाहन केले आहे. याचा फायदा निश्चित राजस्थानला होईल. राजस्थानमध्ये हेरिटेज टुरिझम, फिल्म टुरिझम, इको टुरिझम, रुरल टुरिझम, बॉर्डर एरिया टुरिझम हे वाढवण्याच्या अनेक शक्यता आहेत. या क्षेत्रांमधील तुमची गुंतवणूक राजस्थानच्या पर्यटन क्षेत्राला बळ देईल आणि तुमचा उद्योग देखील वाढवेल. असे पंतप्रधान म्हणाले.

Protected Content