Home Cities जळगाव गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात गणरायाला भावपूर्ण निरोप

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात गणरायाला भावपूर्ण निरोप

0
137

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात दस दिवसांच्या भक्तिपूर्ण वातावरणानंतर लाडक्या बाप्पाला जल्लोषात निरोप देण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत आणि गणपती बाप्पा मोरया! च्या जयघोषात विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करत बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी गणेश पूजेनं झाली. यावेळी श्री. मुरलीधर वायकोळे यांनी पत्नीसमवेत महापूजा आणि होम-हवन पार पाडले. या पूजेला महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूजनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकी पाटील आणि महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.

विसर्जन मिरवणुकीची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रांगणातून झाली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशात सजून ढोल-ताशांच्या तालावर नृत्य करत एम.आय.डी.सी. परिसरात मिरवणूक काढली. गुलाल उधळत ही मिरवणूक गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत नेण्यात आली. मिरवणुकीत उत्साह, भक्तिभाव आणि सांघिकतेचे सुंदर प्रदर्शन पाहायला मिळाले.

गणेशोत्सव हा महाविद्यालयात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही विद्यार्थ्यांनी संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडवत बाप्पाला निरोप दिला. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Protected Content

Play sound