सुप्रीम कामगारांची पतसंस्थेत अपहार; चौकशीसाठी स्वातंत्र्यदिनी लाक्षणिक उपोषण

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रीम कामगारांची पतसंस्थेत झालेल्या बेकायदेशीर व्यवहार व अपहार प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता गुणवंतराव जयवंतराव सोनवणे यांनी मंगळवारी १५  ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे.

 

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, जळगाव शहरातील सुप्रीम कामगारांची सहकारी पतसंस्थेत माहिती अधिकार कार्यकर्ता गुणवंतराव सोनवणे हे गेल्या १० ते १२ वर्षांपासून सभासद आहे. दरम्यान सुप्रीम कामगारांची सहकारी पतसंस्थेत बेकायदेशीर व्यवहार व अपहर प्रकरणी जयवंतराव सोनवणे यांनी १३ डिसेंबर २०२२ रोजी तालुका उपनिबंधक यांच्याकडे १३  मुद्द्यांबाबत माहिती मागविण्यात आली होती. त्यानुसार पतसंस्थेचे चेअरमन व सचिव यांच्याकडे देखील याबाबत अर्ज केला होता. यामध्ये पतसंस्थेत अनेक प्रकारची अनिमित्त व भ्रष्टाचार असल्यामुळे त्याची चौकशी करावी, याबाबत तालुका उपनिबंधकांनी सहाय्यक सहकार अधिकारी राहुल कांबळे यांच्याकडे पतसंस्थेत प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केलेले राहूल कांबळे यांनी अद्यापपर्यंत माहितीच्या अधिकारानुसार कोणतीही कारवाई अथवा उत्तर मिळाले नाही. तसेच प्राधिकृत अधिकारी राहुल कांबळे हे स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करत पतसंस्थेतील भ्रष्टाचार उघड होऊ नये, यासाठी उडवाउडवीची उत्तर देत आहे. अशा अधिकाऱ्यांची तातडीने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील यापूर्वी केली होती परंतु शासनाकडून कुठलीही दखल न घेतल्यामुळे अखेर तक्रारदार गुणवंतराव सोनवणे यांनी स्वातंत्र्यदिनी मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे.

Protected Content