कायद्याचा सक्त वापर करुन नागरिकांची भिती हटवा; आ. सावकारे यांचे पोलीस अधिक्षकांना पत्र

भुसावळ प्रतिनिधी ।  शहरात बनावट दारुचा कारखाना कार्यरत आहे. याबाबत पोलिस प्रशासन अनभिज्ञ असल्याने. या प्रकाराकडे जिल्हा पोलिस अधिक्षकांनी लक्ष घालत कायद्याचा सक्त वापर करुन सदर गुन्ह्यांमध्ये आळा घालुन भुसावळकरांच्या मनातील भिती दुर करावी व पोलिसांविषयी सन्मान दृढ करावा असे पत्र आ. संजय सावकरे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याकडे केली आहे.

याबाबत निवेदनात, शहर आधीच खुन, दरोडे, मारामारी, खंडणी सारख्या गुन्ह्यात बदनाम आहे. तसेच बनावट दारु व अवैध गुटखा विक्रीची कारवाई यापूर्वी ही झाली आहे. त्यांनतर ही शहरात अशा प्रकारचे धंदे सुरुच आहे. याबाबतची माहिती स्थानिक पोलिस प्रशासनाला नसावी का? किंवा काही लोकांच्या आशिर्वादाने असल्याशिवाय असे धंदे सुरु राहुच शकत नाही. आधीच गुन्हेगारीमुळे शहर बदनाम झाले आहे, नित्याच्याच झालेल्या गुन्हेगारी मुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही भिती काढण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षकांनी कायद्याचा सक्त वापर करण्याबाबत पत्रात नमुद केले आहे. शहरातील कन्हाळा रोड भगात बनावट देशी दारुच्या साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपुर पथकाने कारवाई करुन ११ लाखांचा बनावट दारुचा मुद्देमाल जप्त केला होता. यापूर्वीही अशा प्रकारे अवैध व बनावट दारुची कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही हे धंदे राजरोस सुरु आहे या घटनांवर आळा बसण्यासाठी आ. सावकारे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षांना पत्र दिले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!