खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विज कामागारांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी विज कामगार 18 जानेवारी रोजी मध्यरात्रीपासून संपावर जात आहे. यासंदर्भात खामगाव उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी राजेंद्र जाधव यांना संघर्ष कृती समिती पदाधिकारी यांनीतर्फे निवेदन देण्यात आले.
दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महाराष्ट्रातील कृषी, घरगुती औद्योगिक वाणिज्य व इतर दोन कोटी 84 लक्ष 65 हजारावर वीज ग्राहकांना वीज पुरवठा करीत आहे. दर महिन्याला आठ हजार पाचशे कोटींचा महसूल मिळवत असून .वर्षाला 8500 कोटीचा महसूल मिळत आहे. महावितरण कंपनीने देशात नव्हे तर आशिया खंडातील अग्रगण्य कंपनी म्हणून नावलौकिक मिळविले महावितरण भाजपाने अदानी कंपनीला सोपवण्याचे षड्यंत्र रचले असून या प्रकाराविरुद्ध महावितरण मधील सर्वात जवळपास ३० संघटनांनी या षडयंत्र विरोधात दंड थोपटले आहेत. याप्रकरणी वीज कामगार अधिकारी अभियंते संघर्ष समितीने 18 जानेवारी 2023 च्या मध्यरात्रीपासून बेमुत संपावर जाण्याचा इशारा सरकारला दिला आहे.
महावितरण कंपनी तयार केलेले मॉडेल देशातील अनेक वितरण कंपन्यांनी स्वीकारले आहे. महावितरण कंपनीने मुंबई कोल्हापूर, महाड, सांगली व राज्यातील इतर भागात झालेली महापूर तसेच निसर्ग व फायमान चक्र वादळात विक्रमी वेळेस खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम देखील केले आहे. उलट वितरण क्षेत्रात काम करणाऱ्या टाटा रिलायन्स व अदानी कंपनीचे शक्य झाले नाही. वितरण क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या या महावितरण कंपनीकडे खाजगी कंपन्यांचे झालेले लक्ष लागले असून अदानी इलेक्ट्रिकल कंपनीने ठाणे व रायगड जिल्ह्यातील महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडळ क्षेत्रात येत असलेल्या ठाणे भांडुप मुलुंड वाशी नेरूळ खारघर कळंबोली पनवेल व उरण या भागांमध्ये वितरण करण्याचा परवाना महाराष्ट्र राज्य विद्युत निर्माण कडे मागितला आहे. टाटा व टोरेंटो पॉवर पुणे नागपूर कल्याण या परिमंडळामध्ये वितरणाचा परवाना मागणार असल्याचे समजते कोणतीही नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभे न करता महावितरणाच्या इन्फ्रास्ट्रक्चर वर स्वतःची मीटर लावून वीज ग्राहकांना वीज पुरवठा करणार आहे. आता कॉर्पोरेट घराण्यांचा चढावडीत अदानीनंतर नागपूर व पुणे इशारे टोरेंटो घेण्याच्या शर्यतीत असण्याची माहिती आहे. या सर्व बाबींना खाजगी करणारा व शासकीय कंपन्यांना नेस्तनाबूत कॉर्पोरेट घराकडून शासनाच्या आशीर्वाद सुरू असण्याचा आरोप महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी संघर्ष समितीने केला आहे .अदानी पावर इलेक्ट्रिकलला महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रामध्ये वितरणाचा परवाना देण्यास वीज उद्योगातील महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियते अधिकारी संघर्ष समितीमध्ये सब ऑडिट इंजिनिअर असोसिएशन, स्वाभिमानी वर्कस युनियन, विज कामगार महासंघ ,विविध तांत्रिक संघटना इलेक्ट्रिसिटी लाइन्स्टॉप, असोसिएशन अधिकारी संघटना, इंटक यांच्यासह 30 वीज कामगार संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. याकरता खामगाव उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी खामगांव राजेंद्र जाधव यांना संघर्ष कृती समिती पदाधिकारी तथा सदस्य यांचे तर्फे निवेदन देण्यात आले.