Home धर्म-समाज खामगाव येथे वीज ग्राहक तक्रार निवारण मेळावा (व्हिडीओ)

खामगाव येथे वीज ग्राहक तक्रार निवारण मेळावा (व्हिडीओ)


khamgaon

खामगाव, प्रतिनिधी | येथील महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने आज (दि.१) ग्राहक तक्रार निवारण व जनसंपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शहर व ग्रामीण भागातील ग्राहकांचे वीजबिल कमी-अधिक प्रमाणात येणे, नवीन मीटर जोडणी देणे, फॉल्टी मीटर बदलणे अशा अनेक तक्रारींचे व दैनंदिन तक्रारींचे निवारण यावेळी करण्यात आले.

 

या मेळाव्यात जवळपास २२५ ग्राहकांनी सुसंवाद साधून आपापल्या तक्रारीचे निवारण करून घेतले. वीज बिल कमी, अधिक प्रमाणात येत असणाऱ्या ग्राहकांचा प्रश्‍न सोडवण्यात आला तर ग्राहकांना फॉल्टी मीटर बदली व ग्राहकांना नवीन मीटर जोडणी देण्यात आली. या मेळाव्यात तक्रारींचे निवारण करण्यासाठी कार्यकारी अभियंता बद्रीनाथ जायभाये, अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेलोडे, उपकार्यकारी अभियंता शेटे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

 


Protected Content

Play sound