अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील नागरिकांना तब्बल २० वर्षांनी विजेचा पोल मिळाला आहे.


याबाबतचे वृत्त असे की, प्रभाग १४ मध्ये अनेक वर्षापासून विजेचा पोल नसल्याने अंधार राहत असे स्थानिक रहिवाशी मोठ्या प्रमाणावर नाराज होते. यासाठी खूप पाठपुरावा करण्यात आला. तथापि, प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नव्हती. परंतु प्रभाग १४ मध्ये नगरसेविका श्रीमती कमलबाई पितांबर पाटील यांच्या माध्यमातून त्यांचे पुत्र सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील यांनी हा प्रश्न अखेर मार्गी लावला आहे.
रविद्र पाटील यांनी स्वत: उभे राहून व नगरपालिका कर्मचार्यांना सोबत घेऊन इलेक्ट्रिक पोल व तार टाकून दिले. याप्रसंगी सुभाष धमके, दगडू पाटील , भालचंद्र चौधरी, भोई गुरुजी, शिंदे सर, शिवाजी आप्पा, बोरसे टेलर, भोला, प्रशांत पाटील, निखिल शिंदे, शरद गुजर व नगरपरिषदेचे मुकादम गोपाल गजरे आणि कर्मचारी उपस्थित होते. तब्बल दोन दशकांपासून कायम असणारी ही समस्या मार्गी लावल्याबद्दल या परिसरातील नागरिकांनी माजी आमदार साहेबराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, नगरसेविका श्रीमती कमलबाई पितांबर पाटील यांच्या माध्यमातून त्यांचे पुत्र सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील यांचे आभार मानले आहे.


