बिहारमध्ये निवडणूक होणारच

नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बिहार निवडणूक पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.

जोपर्यंत बिहार राज्य करोनामुक्त होत नाही तोपर्यंत निवडणूक घेतली जाऊ नये अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावताना हा मुद्दा अपरिपक्व असल्याचं म्हटलं.

न्यायाधीश अशोक भूषण यांनी याचिका फेटाळताना सांगितलं की, “निवडणूक पुढे ढकलण्यासाठी कोविड आधार असू शकत नाही. मुख्य म्हणजे अद्याप निवडणुकीची सूचनाही प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. ही याचिका गैरसमजातून करण्यात आलेली असून तिला दाखल करुन घेऊ शकत नाही”.

Protected Content