यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया चालू झाली असून यामुळे तालुक्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.
संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधणार्या यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या दिनांक ४ फेब्रुवारी २०२४रोजी होणार्या पंचवार्षीक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाले असुन उमेदवारी अर्ज विक्रीस सुरुवात झाली असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी नंदकिशोर मोरे दिली आहे.
तालुक्यातील शेतकर्यांच्या हितासाठी क्रांतीकारी निर्णय घेत सहकार क्षेत्रातील भरारी घेतलेल्या यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघ ,मर्यादीत सहकारी संस्थेच्या पंचवार्षीक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असुन, यावल तालुका खरेदी विक्री सहकारी संघ , मर्यादित,सोसायटीच्या निवडणुकीत व्यक्तीशः व वर्ग सभासद निवडून देण्याची संख्या ५ आहे. तसेच, संस्था अ वर्ग सभासद जागेतुन ७ संचालक , अनुसुचित जाती /जमाती राखीव जागासाठी १ संचालक,महिला राखीव जागे साठी २ संचालक , इतर मागास प्रर्वग राखीव जागा१ संचालक, विमुक्त जाती / भटक्या जमाती / विशेष प्रर्वगासाठी राखीव १ संचालक असे एकुण १७ संचालक निवडून येणार आहेत.
दरम्यान, यावल येथे दिनांक २ जानेवारी २०२४पासुन उमेदवारी अर्ज सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,यावल या ठीकाणी अर्ज विक्री व स्विकारण्याच्या प्रक्रीयेस सुरुवात झाली असुन, दिनांक ४ जानेवारी पर्यत एकुण ६५ अर्जांची विक्री झाली आहे. यातील २३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची अंतीम ६ जानेवारी २०२४ असु , दिनांक ९ जानेवारी २०२४ रोजी उमेदवारी अर्ज छाननी होणार आहेत. नामनिर्दशन यादी दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल , नामनिर्दशन अर्ज माघारी दिनांक १० जानेवारी ते २४ / १ / २०२४ अशी राहणार आहे . दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी पात्र उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.
दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणुकीचे मतदान होणार असुन या निवडणुकीत २८२५ सभासद आणी ४८ सहकारी सोसायटीचे असे एकुण२८७३ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील,दिनांक ५ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी नंदकिशोर मोरे यांनी दिली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्यातील सहकार क्षेत्रात आणि अर्थातच राजकीय क्षेत्रातील वातावरण तापणार असल्याचे दिसून येत आहे.