भ्रष्टाचार विरोधी मोर्चा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी वैशाली चौधरी यांची निवड

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज  प्रतिनिधी | भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी वैशाली चौधरी तर जामनेर शहराध्यक्षपदी नीलम मुळे यांची निवड करण्यात आली आहे.

 

शहरातील वाकी रोडवरील वाचनालयामध्ये भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली संघटनेची बैठक प्रदेशाध्यक्ष राहुल गंगावणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी महिला पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये महिला जिल्हाध्यक्षपदी वैशाली चौधरी जिल्हा सचिव पदी रेखा पोळ तर जामनेर शहराध्यक्षपदी नीलम मुळे यांची निवड करण्यात आली आहे.  याबाबतचे पत्र देण्यात आले असून यावेळी भ्रष्टाचार विरोधी मोर्चा संघटना प्रदेशाध्यक्ष राहुल गंगावणे वैशाली विसपुते संतोष भगत अतुल सोनवणे रवींद्र सूर्यवंशी गजानन कैलास दादाराव साबळे कुणाल सरळकर सविता वाघ भाग्यश्री पाटील यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.  यावेळी  प्रदेशाध्यक्ष राहुल गंगावणे यांनी आज  मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून जनतेची लूट केली जात आहे.  त्यामुळे आपल्या भ्रष्टाचार विरोधी मोर्चा संघटनेची माध्यमातून महिलांनी पुढाकार घेऊन आपण सर्वांनी भ्रष्टाचाराविरुद्ध पुढाकार घेतला पाहिजे. कारण भ्रष्टाचारामुळे सर्वसाधारण नागरिक भरडला जात असल्याने आपण लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी भ्रष्टाचार विरोधात काम केलं पाहिजे.  त्याचबरोबर आंदोलन पुकारले पाहिजे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचार मुक्त भारत संकल्पनेनुसार आपण भ्रष्टाचार विरोधात काम करावे असे आवाहन या बैठकीत बोलताना त्यांनी केले.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.