भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सदर नियुक्ती पुढील तीन वर्ष किंवा पुढील आदेश येई पर्यंत लागू राहील सदर दिलेले पद हे मानद स्वरूपांचे असून भारतीय संविधान,भारतीय कायदे व माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची आचारसंहिता यांचे काटेकोर पालन करावयाचे आहे. सदर पदावर राहून माहिती अधिकार अधिनियम २००५ चा व्यापक जनहितासाठी वापर करावा तसेच सर्व सामान्य नागरिकांमध्ये व समाजामध्ये माहिती अधिकार अधिनियम २००५ चा प्रसार व प्रचार करावा अशी अपेक्षा नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
शकील शेख यांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. शकील शेख यांच्या निवडीबद्दल त्यांचे नातेवाईक मित्रपरिवार व पत्रकार बंधू सामाजिक कार्यकर्ता सर्वच स्थरातून अभिनंदन केले जात आहे. शकील शेख हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात नेहमी अग्रेसर असतात