यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली असुन, यावल तालुका अध्यक्षपदी प्रविण सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे . यावल येथे संपन्न झालेल्या संघटनेच्या बैठकीत प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे संस्थापक माजी मंत्री बच्चुभाऊ कडू, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये दि. १०/११/२०२३ रोजी रावेर रेस्ट हाऊस येथे आयोजित करण्यात आला होता, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश चिघु पाटील व उपजिल्हाध्यक्ष दिनेश सैमिरे यांचे उपस्थितीत दिव्यांग बांधवांचा भव्य मेळावा पार पडला. यावेळी जळगांव जिल्ह्यातील बहुसंख्य दिव्यांग बंधु-भगिनी उपस्थित होते. या मेळाव्यात दिव्यांग बांधवांच्या समस्या व येणा-या अडचणी यांच्यावर चर्चा झाली.
त्याच बरोबर तालुक्यातील रिक्त जागांवर नव्याने नेमणुका करण्यात आल्या.यावल तालुक्याचे तालुकाध्यक्ष कै. मोहनभाऊ सोनार यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर यावल येथील प्रविण अनिल सोनवणे यांची “तालुकाध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली. तसेच मुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी सोपान नामदेव कोळी तर सचिव म्हणून हिरामण भोई व उपाध्यक्ष म्हणून रोहीदास रामा मढे यांची एकमताने निवड करण्यात आली. रावेर तालुकाध्यक्ष म्हणुन जितूभाऊ कोळी, सदस्य म्हणुन सुभाष धांडे, शब्बीर शेख रशिद तसेच यावल तालूका रूग्णसेवक पदी नजिमखान यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी प्रदीप माळी, राहुल (मिथुन) सावखेडकर, उत्तम कानडे, जनार्दन फेगडे, दिलीप चौधरी, दिलीप आमोदकर इ. प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते..