यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सावखेडा सिम येथील यावल पंचायत समितीचे माजी सदस्य व यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य पक्षाचे एकनिष्ठ व सक्रीय कार्यकर्ते नागेश्वर कौत्तीक साळवे यांची भारतीय जनता पक्षाच्या अनुसुचित जाती मोर्चाच्या जळगाव पुर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
नागेश्वर कौत्तीक साळवे यांची निवड भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हा पुर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी पत्राव्दारे ही निवड केली असुन, नागेश्वर साळवे यांच्या निवडीचे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन, रावेर लोकसभा खासदार रक्षाताई खडसे, जळगाव लोकसभा खासदार उन्मेष पाटील, जळगावचे आमदार सुरेश भोळे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, भुसावळ आमदार संजय सावकारे, भाजप यावल तालुक्याचे अध्यक्ष उमेश फेगडे, भाजप सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राकेश फेगडे, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष नारायण चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, शरद महाजन, डॉ कुंदन फेगडे, जिल्हा परिषदचे माजी शिक्षण समिती सभापती रविन्द्र पाटील, सुरेश पाटील, दहिगावचे उपसरपंच देवीदास पाटील यांच्यासह पक्षातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वागत केले आहे