भोपाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाला बहुमत मिळाले आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री पदाची देखील घोषणा करून निवड करण्यात आली. मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी मोहन यादव यांची निवड करण्यात आली.
मोहन यादव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जातात. शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात मोहन यादव यांनी काम केलेले आहे. आज भाजपच्या विधीमंडळ गटनेता ठरवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवराजसिंह चौहान यांनीच मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला भाजप आमदारांनी अनुमोदन दिल्याने, मोहन यादव हे मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
३ डिसेंबर रोजी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता. त्यानंतर आठ दिवसानंतर मोहन यादव यांच्या नावावर शिक्काबोर्तब करण्यात आलेय. मोहन यादव उज्जैन दक्षिणमधून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. मोहन यादव यांची मुख्यमंत्रीपदी निवड करत भाजपने देशभरातील लोकांना चकीत केलेय. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता.
दरम्यान, मोहन यादव यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झाले असताना, मध्य प्रदेशात दोन उपमुख्यमंत्री करण्याचं भाजपने ठरविण्यात आले आहे. त्यानुसार राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवडा हे उपमुख्यमंत्री असतील. तर केंद्रात कृषीमंत्री असलेले नरेंद्रसिंह तोमर हे मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष असतील. विधीमंडळ गटनेता ठरवण्याच्या बैठकीत डॉ. मोहन यादव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यावेळी मोहन यादव यांनी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आशीर्वाद घेतले. शिवराज सिंह यांनीही त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून आशीर्वाद दिला. मोहन यादव हे मध्य प्रदेशातील भाजपाचा मोठा ओबीसी चेहरा आहेत.