Home Cities यावल ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग सहकारी संस्थेची संचालकांची निवडणुक बिनविरोध

ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग सहकारी संस्थेची संचालकांची निवडणुक बिनविरोध


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग अॅण्ड प्रक्रीया सहकारी संस्था मर्या. फैजपुरच्या पंचवार्षीक संचालक मंडळाची निवडणुक सन २०२३ ते २०२८ या कालावधी करीता संपन्न झाली.

यात ११ पैकी ९ उमेदवार हे अविरोध निवडून आले असुन,विजयी झालेल्या उमेदवाराची नावे पुढील प्रमाणे १. चौधरी रमेश सर्वसाधारण, २. कोलते रविंद्र सर्वसाधारण, ३. पिंपळे देविदास सर्वसाधारण, ४. चौधरी विलास सर्वसाधारण, ५. पाटील अमोल सर्वसाधारण, महिला राखीवमध्ये बोंडे ज्योती, चौधरी हेमलता यांची निवड करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पाटील हर्षल गोविंदा इतर मागासवर्गीय, धनके विलास यांची बिनविरोध निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी डी. जे. तडवी यांनी काम पाहिले. संपूर्ण निवडणुक प्रक्रीया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. नवनिर्वाचित सदस्यांचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, भाजपाचे जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, शरद महाजन व तालुका अध्यक्ष उमेश फेगडे आदींनी स्वागत केले आहे.


Protected Content

Play sound