अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातची त्रैमासिक सभा नुकतीच जळगाव येथे पार पडली. या सभेत माळी समाजाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या मंडळाच्या कार्यवाहपदी ‘माळीभूषण’ मासिकाचे संपादक भीमराव महाजन यांची निवड करण्यात आली.
या बैठकीत मंडळाचे अध्यक्ष प्रा.ए.के.गंभीर, ज्येष्ठ मार्गदर्शक माजी अध्यक्ष नीलकंठ महाजन, माजी जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन, उपाध्यक्ष सुरेश महाजन, सचिव किशोर राजकुळे, सहसचिव योगेश महाजन, पुंडलिक चौधरी, दगडू महाजन, नरेश महाजन, संजय महाजन, चित्राताई माळी, शांताराम महाजन, सुरेश महाजन, प्रा. प्रकाश माळी, गुलाब महाजन, वासुदेव महाजन, दीपक महाजन, कैलास महाजन, गणेश महाजन, लालचंद महाजन, शिवाजी महाराज, गिरीश महाजन, कैलास महाजन यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि समाज भवनचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर माळी उपस्थित होते. यावेळी भीमराव महाजन यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.