राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणूकांची तारीख जाहीर

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी  राज्य निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केली असून ४ ऑगस्ट रोजी मतदार घेण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यामुळे ६२ तालुक्यातील २७१ ग्रामपंचायतीच्या निवणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्याने आजपासून संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.  ४ ऑगस्ट रोजी मतदान, ५ ऑगस्ट रोजी  मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.  ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेल्या तालुक्यांत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये ६२ तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदार ५ जुलै २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.

असा असेल निवडणूकीचा कार्यक्रम

नामनिर्देशनपत्रांची छाननी २० जुलै रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २२ जुलै रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत असेल. मतदान ४ ऑगस्ट सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. ५ ऑगस्ट रोजी मतमोजणी होईल.

कोणत्या तालुक्यातील किती ग्रामपंचायतींचा समावेश

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या :-

नाशिक : बागलाण- 13, निफाड- 1, सिन्नर- 2, येवला- 4, चांदवड- 1, देवळा- 13 आणि नांदगाव- 6.

धुळे : धुळे- 2, साक्री- 49 आणि शिंदखेडा- 1.

जळगाव : रावेर- 12, अमळनेर- 1, एरंडोल- 2, पारोळा- 3 आणि चाळीसगाव- 6.

अहमदनगर : अहमदनगर- 3, श्रीगोंदा- 2, कर्जत- 3, शेवगाव- 1, राहुरी- 3 आणि संगमनेर- 3.

पुणे : हवेली- 5, शिरुर- 6, बारामती- 2, इंदापूर- 4 आणि पुरंदर- 2.

सोलापूर : सोलापूर- 2, बार्शी- 2, अक्कलकोट- 3, मोहोळ- 1, माढा- 2, करमाळा- 8, पंढरपूर- 2, माळशिरस- 1 आणि मंगळवेढा- 4.

सातारा : कराड- 9 आणि फलटण- 1.

सांगली : तासगाव- 1.

औरंगाबाद : औरंगाबाद- 1, पैठण- 7, गंगापूर- 2, वैजापूर- 2, खुलताबाद- 1, सिल्लोड- 3, जालना- 6, परतूर- 1, बदनापूर- 19 आणि मंठा- 2.

बीड : बीड- 3, गेवराई- 5 आणि अंबेजोगाई- 5.

लातूर : रेणापूर- 4, देवणी- 1 आणि शिरूर अनंतपाळ- 4.

उस्मानाबाद : तुळजापूर- 2, कळंब- 1, उमरगा- 5, लोहारा- 2 आणि वाशी- 1. परभणी: सेलू- 3.

बुलढाणा : खामगाव- 2 आणि मलकापूर- 3.

 

Protected Content