आयशरच्या धडकेत दुचाकीवरील वृध्द महिला जागीच ठार; तर दोन जण जखमी !

अडावद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीने वळन घेत असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील वृध्द आजीचा जागीच मृत्यू झाला तर आजोबा आणि नातू गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार १५ जून रोजी सकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात रात्री ८.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजाबाई सोनारिंग बारेला रा. उसमळी ता. यावल जि.जळगाव असे मयत झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सुभाष चोटीराम बारेला वय २० रा. उसमळी ता. यावल हा तरूण अपल्या कुटुंबासह वातव्याला आहे. शनिवारी १५ जून रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास हता अडावद गावाकडून चोपडा येथे जाण्यासाठी आज गजाबाई सोनारसिंग बारेला आणि आजोबा सोनारसिंग पिदा बारेला यांच्या सोबत दुचाकी एमएच १९ सीटी ४२६३ ने निघाले होते. त्यावळी अडावद गावाजवळील पोट्रोल पंपाजवळ पेंट्रेाल भरण्यासाठी सुभाष बारेला याने दुकाळी पेट्रोलपंपाजवळ हळहळू केली. त्यावेळी वळण घेण्याच्या तयारी तसतांना त्याला आयशर क्रमांक एएच ०४ एफजे ५४९७ ने जोरदार धडक दिली. या धडकेत गजाबाई बारेला या वृध्द महिला जागीच ठार झाले तर सुभाष बारेला आणि त्याचे आजोबा सोनारसिंग बारेला हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी रात्री ८ वाजता अडावद पोलीस ठज्ञण्यात अज्ञात आयश्न चालकावर गुन्हा दााल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नसिर तडवी हे करीत आहे.

Protected Content