जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।जळगाव शहरातील समता नगर येथील एका ६० वर्षीय वृद्ध महिलेला धक्का देऊन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी १७ मे रोजी सकाळी १० वाजता घडला आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील समता नगर भागातील एका भागात ६० वर्षीय वृद्ध महिला ह्या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्या भागातच राहणारे नारायण गोविंदा इंगळे वय-७०,हे देखील राहतात. शुक्रवारी १७ मे रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या अंगणात भाजीपाला घेण्यासाठी आले होते. त्यावेळी संशयित आरोपी नारायण गोविंदा इंगळे यांनी महिलेला धक्का दिला. या कारणावरून महिलेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी ७ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी नारायण इंगळे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान मलिक करीत आहे.