सुसाट कारच्या धडकेत वृध्द महिला ठार

पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील हिरापूर फाट्यावरील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील ७५ वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलबाई नारायण माळी वय ७५ रा. बाभळेगाव ता. पारोळा असे मयत झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील बाभळीगावात कमलबाई माळी ह्या वृध्द महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला होत्या. बुधवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांचा नातू पृथ्वीराज धनराज माळी वय ३६ हा त्यांची आजी कमलबाई माळी यांना दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीके ८४०२) वर बसवून बाभळेगावकडून पारोळा येथे घेवून जात असतांना हिरापूर फाट्याजवळ मागून येणाऱ्या कार क्रमांक (एमएच ०२ बीटी ८३९२) ने जोरदार धडक दिली. या धडकेत कमलबाई माळी ह्या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर पृथ्वीराज माळी हा जखमी झाला. याप्रकरणी पृथ्वीराज माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालकाविरोधात पारोळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ डॉ. शरद पाटील हे करीत आहे.

Protected Content